Top News

फारूक शाब्दी यांच्या विरोधात AIMIM पक्षाकडूनच विरोधकांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला का?

 



सोलापूर - महाराष्ट्रातील एमआयएम पक्षाला मोठं खिंडार पडले आहे.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एमआयएम (AIMIM) पक्षांतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सोलापूर जिल्ह्याचे माजी वरिष्ठ नेते फारूक शाब्दी यांच्या विरोधात पक्षाकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप पुढे आले आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात सोलापुरातील पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे निर्णय व बदल हे कोणतीही पूर्वसूचना न देता घेतले गेले. या निर्णयांमुळे फारूक शाब्दी यांची भूमिका कमकुवत करण्याचा हेतू होता. फारूक शाब्दी यांच्या राजीनाम्याने एमआयएम पक्षाला जबरदस्त हादरा बसला आहे.



राजीनामा दिल्यानंतर हजारो कार्यकर्ते फारूक शाब्दी यांच्या निवासस्थानी जमा झाले होते. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर पक्ष बळकट करणे हाच खरा उद्देश पक्षाचा असता, तर सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले गेले असते. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडकीस आली आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून फारूक शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.या प्रकारामुळे सोलापुरातील AIMIM कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ऐनमहानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला हादरा बसला आहे.आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे कामकाज कसे चालेल आणि किती नगरसेवक निवडून येतील याबाबत संशय निर्माण होत आहे.पक्ष नेतृत्वाकडून यावर कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post