सोलापूर - सोलापूर शहरातील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या महेबूब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुमठे वय 50 यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. दौला कुमठे याच्याविरुद्ध सन 2005,2015,2018 व 2025 या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना साथीदारासह मारहाण करून दमदाटी करणे, जागेची खोटी कागदपत्रे बनवून गोरगरीब जनतेची घर जागा बळकवणे, घातक हत्याराचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दौला कुमठेवर दाखल होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) (ब ) अन्वय तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाळे यांनी तडीपारची कारवाई करत दौला कुमठे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.

Post a Comment