सोलापूर - सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटर वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यासह एका खासगी इसमास घेताना लाच घेताना पकडण्यात आले आहे. मोटर वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ राहणार लातूर व अमोल आप्पासाहेब पाटील राहणार अवंती नगर शिवाजीनगर सोलापूर असे रकमेसह पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अडीच हजार रुपयाची लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आला आले असून मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मालवाहू ट्रेलर वर चालक म्हणून कार्यरत आहे. नेहमी गुजरात ते चेन्नई यादरम्यान वाल वाहतूक करत असतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे आरटीओ चा चेक पोस्ट आहे ते पास करण्यासाठी तेथे कर्तव्यावर असणारे वाहक निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी सुद्धा दोन हजार रुपये घेतले होते.
तक्रारदार हे नांदणी येथील चेक पोस्ट येथे मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्या कक्षात गाडी पास करण्यासाठी परमिट घेऊन गेले असता आलोसे यांच्या शेजारी बसलेल्या खाजगी इसम अमोल पाटील यांना तक्रारदार यांच्याकडे गाडी पास करण्यासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली, तळजोडे यांची अडीच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्या कक्षात शेजारी बसलेले खाजगी इसम अमोल पाटील यांनी तक्रार यांच्याकडून अडीच हजार लाच स्वीकारून मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्यासमोरील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले असता दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रकमेसह ताब्यात घेतले आहे.

Post a Comment