Ticker

6/recent/ticker-posts

एमआयएमच्या नगरसेवकांची पालिका सभागृहात चिडीचूप

 



सोलापूर - सोलापूर महानगर पालिकेची सोमवारी 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सोलापूर शहराला पाणी पुरवठा सुरूळीत करायचा या विषयावर वादळी सभा पार पडली. शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी 892 कोटींचे टेंडर 1400 कोटी कसे काय झाले या विषयावरून सभेत सत्ताधारी भाजप पक्षाला धारेवर धरले होते. दरवेळी सोलापूर पालिकेच्या सभेत या दोन नगरसेवकांचा आवाज घुमत असतो. अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपच्या नाकी नऊ आणले आहे. भाजप नंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून सोलापूर महानगर पालिकेत ओळखला जाणारा एमआयएम पक्ष मात्र मूग गिळून गप्प का असतो असा सवाल प्रभागात होत आहे. नऊ नगरसेवक असून काय फायदा अशीही चर्चा सुरू आहे.


सोमवारी सोलापूर महानगरपालिका सभागृहात अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सोलापूर करासाठी आवाज उठविला, पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या नादात सोलापूर महानगरपालिका  सोलापूरकरांवर अतिरिक्त कर वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे ठासून सांगीतले.महापौर विनायक कोंड्याल यांनी सभेत गोंधळ पाहून शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांना एक दिवसा साठी निलंबित केले.या सर्व  गोंधळात  एमआयएम पक्षाचे सर्व नगरसेवक चिडीचूप होते.सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत  एमआयएमच्या फक्त एका महिला नगरसेवकाने थोडेफार बोलण्याचा प्रयत्न केला होता. बाकीच्या नगरसेवकांना काही कळले का नाही..? असा प्रश्न निर्माण होत आहे. सोलापूर महानगरपालिका सभागृहात एमआयएम पक्षाचे नगरसेवक एकमेकांना कावरेबवरे होऊन पाहत होते.

एमआयएमच्या आठ नगरसेवकांना जनतेने थेट निवडून दिले आहे. एक स्वीकृत नगरसेवक आहे.प्रभागातील जनतेचा आवाज होऊन हे नगरसेवक जनतेची व्यथा मांडतील अशी अपेक्षा प्रभागातील जनतेला आहे. मात्र हे नऊ नगरसेवक सोलापूर महानगर पालिकेत फक्त बघ्याची भूमिका घेत मूग गिळून गप्प बसत आहेत.



Post a Comment

0 Comments