सोलापूर - शहरातील नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथे एका अज्ञात कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माँ आयेशा हॉल जवळ झालेल्या या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागनाथ नगर भागातील माँ आयेशा हॉल जवळ दोन गट किरकोळ कारणावरून हाणामारी झाली.या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर तात्काळ जखमींना सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू अजून जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही.


घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.हाणामारी नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.