Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर ब्रेकिंग । रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह

 


सोलापूर - सोलापूर शहरातील गजबजलेला आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यामध्ये मंगळवारी सायंकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात  खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रूपा भवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या नाल्यात एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.

मृत महिला अंदाजे कोणत्या वयोगटातील आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरात कुणी महिला बेपत्ता आहे का, याचीही चौकशी सुरू केली आहे.घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात  पाठवला आहे.सध्या या घटनेचा अधिक तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत. 

Post a Comment

0 Comments