Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांची नजर चुकवून शहरात फिरणाऱ्या 'कडगुड्ड'च्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 





सोलापूर - कायद्याचा बडगा उगारूनही गुन्हेगारी प्रवृत्ती कशी शिरजोर होते, याचा प्रत्यय सोलापुरात पुन्हा एकदा आला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला कुख्यात आरोपी आयप्पा म्हाळप्पा पारट उर्फ कडगुड्ड (वय ३९) याने चक्क पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरात एन्ट्री केली. मात्र, गुन्हे शाखेच्या 'थर्ड आय'पासून तो वाचू शकला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, आयप्पा पारट याला २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) (अ) नुसार दोन वर्षांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हा आदेश धाब्यावर बसवून 'कडगुड्ड' कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रूपा भवानी मंदिराजवळ वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


शहरात गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला हा तडीपार आरोपी संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलीस हवालदार जावीद जमादार, पोलीस कॉन्स्टेबल आबाजी सावळे आणि विठ्ठल यलमार यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून कडगुड्डला ताब्यात घेतले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच खाकीने त्याला आपल्या विळख्यात घेतले होते.ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली, ज्यात त्याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धीरज श्रीकांत सातपुते (गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयप्पा म्हाळप्पा पारट उर्फ कडगुड्ड याच्या विरुद्ध  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लीस हवालदार आरेनवरु या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत


Post a Comment

0 Comments