Ticker

6/recent/ticker-posts

वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरचा बहुमान: डॉ. तनुश्री परळे ठरल्या शहराच्या पहिल्या महिला पोटविकार तज्ज्ञ






सोलापूर  - शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटविकार तज्ज्ञ) म्हणून डॉ. तनुश्री परळे या लवकरच रुग्णसेवा सुरू करणार आहेत. त्या स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक तसेच अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे आपली सेवा देणार आहेत.

डॉ. तनुश्री परळे यांनी आपले संपूर्ण वैद्यकीय शिक्षण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमधून पूर्ण केले आहे. त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधून एमबीबीएस शिक्षण घेतल्यानंतर के.ई.एम. हॉस्पिटल आणि सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज येथून एमडी (मेडिसिन) पूर्ण केले. पुढे त्यांनी मुंबईतील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल येथून गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या सुपर स्पेशालिटीचे प्रशिक्षण घेतले.

याशिवाय, अत्याधुनिक इआरसीपी आणि इयूएस या शस्त्रक्रियांचे विशेष प्रशिक्षण त्यांनी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटल, साकेत येथे पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी युरोपियन स्पेशालिटी एक्झामिनेशन (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी) (ESEGH) उत्तीर्ण करत डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथे पुढील प्रशिक्षण घेतले आहे.

सरकारी रुग्णालयांमधील मर्यादित साधनसामग्रीत काम करण्याचा तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधील अत्याधुनिक सुविधांमध्ये जटिल शस्त्रक्रिया करण्याचा व्यापक अनुभव डॉ. परळे यांना आहे. या अनुभवाच्या बळावर सोलापूरमधील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. तनुश्री परळे यांनी शेकडो एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या असून, बँडिंग, ग्लू इंजेक्शन, डायलटेशन, इआरसीपी आणि इयूएस यांसारख्या थेरप्युटिक उपचारांमध्येही त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. अपचन, आम्लपित्त (GERD), पेप्टिक अल्सर, बद्धकोष्ठता, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या सामान्य तक्रारींपासून ते लिव्हरचे आजार, कावीळ, फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस तसेच अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोहनस डिसीज यांसारख्या जटिल आजारांवरही त्या उपचार करतात.

विशेषतः पाइल्स, फिशर किंवा फिस्टुला यांसारख्या समस्यांबाबत महिलांना मोकळेपणाने संवाद साधता यावा आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी त्यांची सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

डॉ. तनुश्री परळे या अश्विनी हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध असतील. तसेच स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक, सातरस्ता येथे दुपारी २ ते ५ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत त्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.

Post a Comment

0 Comments