सोलापूर - अधिक मासानिमित्त पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार समोरच्या कारला धडकून झालेल्या भीषण अपघातात मायलेक जागीच ठार झाले. अपघातातील जखमी महिलेवर सांगलीतील खाजगी रुग्णालयात तर चौघांवर सांगोल्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात सोमवारी (२५ मे) सकाळी १०:३० च्या सुमारास सांगोला मिरज महामार्गावर जुनोनी (ता. सांगोला) येथील माणदेशी विद्यालयाच्या नजीक घडला. संदीप चिंतामणी भोसले (३०), रेखा चिंतामणी भोसले (वय ६५, दोघेही रा.पलूस, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात ज्योती संदीप भोसले (वय २५), विद्या अनिल भोसले (वय ४२), अनिल चिंतामणी भोसले, वेदांत अनिल भोसले (वय १०), दुर्वा अनिल भोसले (वय ८), वैभव अनिल भोसले (वय १२, सर्वजण रा. पलूस जि. सांगली) जखमी झाले आहेत. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. संभूराजे साळुंखे यांनी खबर दिली आहे.
पलूस औद्योगिक वसाहतीतील अनिल भोसले, संदीप भोसले, रेखा भोसले, ज्योती भोसले, विद्या भोसलेवेदांत भोसले, दुर्वा भोसले व वैभव भोसले हे सर्वजण सोमवारी सकाळी कारमधून आले. देवदर्शन करून पुढे अतिश माने (रा. पेनूर) यांच्याकडे जाणार होते.

0 Comments