सोलापूर : नवोदित चित्रकार स्नेहल नारायणकर व गोरख निंबाळकर यांच्या ‘आर्ट व्हेंचर’ या पेन्सिल व पोर्ट्रेट चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
डफरीन चौकातील पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, नगरसेवक रमेश व्हटकर, मनोहर नारायणकर, चित्रकार नितीन खिलारे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले तसेच राज्य सचिव शांतप्पा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रदर्शनात विविध पेन्सिल स्केचेस व आकर्षक पोर्ट्रेट चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले असून उपस्थितांनी चित्रकारांच्या कलाकृतींचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी सिद्धाराम नालवार, शांताराम शिंदे व वर्षा निरंजन यांचे सहकार्य लाभले. संतोष धारेराव यांनी सूत्रसंचालन केले.

0 Comments