सोलापूर हादरलं ! कृष्णा नगर भागात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ



सोलापूर  - सोलापूर शहरातील स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगर परिसरात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी खूनाची आहे की अन्य काही कारणामुळे घडली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. महादेव मंचाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त होते आणि ते बेडवरच पडून होते.

रविवारी सकाळी बराच वेळ झाला तरी घराचे दार उघडले जात नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावून आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी दार उघडून आत पाहिले असता, पती-पत्नी दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहून शेजाऱ्यांमध्ये घबराट पसरली आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात, म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत.सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, घटनेची बारकाईने तपासणी सुरू आहे. पती-पत्नीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा खून आहे की इतर काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच या घटनेमागील खरे कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments