ब्रेकिंग । ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई






पंढरपूर - पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका येथे ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.दिनांक ३ मार्च २०२६ रोजी मंगळवेढा नाका येथे वाहतूक नियंत्रण करत असताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.


पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित दोन्ही पोलीस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शक राहावी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस कर्मचाऱ्यांनी संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून वागावे, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांनी अधिनस्थांना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments