सोलापूर : पवित्र रमजान महिन्यानिमित्त शहरात विवि ध ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. मात्र, बुधवारी (१८ मार्च) सोलापूर शहरातील सोशल कॉलेजच्या मैदानावर आयोजित इफ्तार पार्टीदरम्यान पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
हाजी फारूक शाब्दी यांच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६:३९ वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपवास सोडण्यासाठी (इफ्तार) मैदानावर जमले होते. यावेळी कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 18 मार्च ते 1 एप्रिल 2026 या कालावधीत विनापरवाना ड्रोन उडवणे, छायाचित्रण करणे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश जारी केले होते. हे आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (1) अंतर्गत लागू करण्यात आले होते.
अशा परिस्थितीत इफ्तार पार्टीत ड्रोन उडवण्यात आल्याने पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी संबंधित आयोजकांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पहा व्हिडीओ -


0 Comments