वंचित बहुजन आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला केलं जोडे मारून आंदोलन

 



सोलापूर - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईल्सबाबत पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जेफ्री एपस्टिन फाईल्सबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, अशी मागणी केली. तोपर्यंत देशभर आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली.या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

Post a Comment

0 Comments