सोलापूर - सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील राजू गांधी नगर, मजरेवाडी येथे राहणाऱ्या एकाच घरातील चार जण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी निसार सलीम सय्यद (वय 25) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शाहीस्ताबेगम अमीन सय्यद (वय 27, रा. भांडेगाव, ता. बार्शी),सलीम अमीर सय्यद (वय 49),इन्शा अमीन सय्यद (वय 07),तैमुर अमीन सय्यद (वय 06) हे चौघेही जण निसार सलीम सय्यद यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. रात्र होऊनही ते परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मित्र, नातेवाईक आणि परिसरातील सर्व ठिकाणी विचारपूस करूनही त्यांचा कोणताही थांगपत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत बेपत्ता दाखल करण्यात आला आहे.सध्या एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.या घटनेमुळे मजरेवाडी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या चौघांबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा ते कोठे दिसल्यास नागरिकांनी त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निसार सलीम सय्याद (भाऊ): ९५०३३५३१०५,
तपासी अंमलदार एम.पी. वाघमोडे (एमआयडीसी पोलीस ठाणे): ७५१७५१७०२७

0 Comments