Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य कार्यकर्त्याच्या गाडीतून विधानसभेच्या उपाध्यक्षांचा प्रवास; अण्णा बनसोडेंच्या साधेपणाची सोलापुरात चर्चा

 



सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान दिसून आलेला साधेपणा सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मोठ्या पदावर असूनही एका सामान्य कार्यकर्त्याच्या गाडीतून प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.अण्णा बनसोडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता, अल्पसंख्यांक विभागातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर, कोठल्याही बडेजावाविना त्यांनी थेट अल्पसंख्यांक विभागाचे सामान्य कार्यकर्ते फारूक मटके यांच्या गाडीत बसणे पसंत केले आणि सोलापूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला.

विशेष म्हणजे, या वेळी फारूक मटके यांच्या गाडीचे सारथी म्हणून अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष रियाज शेख यांनी जबाबदारी पार पाडली. अण्णा बनसोडेंच्या या सहज आणि मनमिळाऊ कार्यशैलीमुळे उपस्थित कार्यकर्ते भारावून गेले.याप्रसंगी अरफत सय्यद, अयाज नदाफ, सलीम नदाफ, याकूब एम.आर., खान यांच्यासह अल्पसंख्यांक विभागाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांसोबतच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या या साधेपणाच्या वृत्तीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.



Post a Comment

0 Comments