Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात धावत्या दुचाकीला लागली अचानक आग

 




सोलापूर -  शहराचा मुख्य भाग असलेल्या गुरुनानक चौक परिसरात शनिवारी दुपारी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, MH 13 EA 9879 या क्रमांकाची दुचाकी शनिवार दुपारी गुरुनानक चौकातून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुचाकीने पेट घेतला. वाहनावर असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या मधोमधच सोडून निघून गेल्याने  त्याचे प्राण वाचले.

आग लागल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी  धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती.या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.

Post a Comment

0 Comments