Ticker

6/recent/ticker-posts

रंगभवन परिसरात हरवलेला बालक सापडला,पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

 





सोलापूर - सोलापूर शहरातील रंगभवन परिसरात १३ वर्षांचा एक मुलगा सापडला आहे. फुरकान निजामुद्दीन खान असे या मुलाचे नाव असून, तो सध्या कोणाच्या तरी शोधात असल्याचे निदर्शनास आले आहे.या मुलाला पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. सद्यस्थितीत सदर बालक सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात सुरक्षित आहे.या मुलाच्या पालकांचा किंवा नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. या मुलाबाबत किंवा त्याच्या पालकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments