सोलापूर - माहेरून सोने आणि पैसे आणण्याच्या हव्यासपोटी एका ३५ वर्षीय नराधमाने आपल्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या मजरेवाडी परिसरात घडली आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नर्गिस फैजान शेख असे पीडित महिलेचे नाव असून, ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
नर्गिस आणि फैजान यांचा विवाह ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे पार पडला होता. संसाराची स्वप्ने रंगवून सासरी गेलेल्या नर्गिसला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी धक्का बसला. पती फैजानचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न मोडले असल्याची माहिती तिला मिळाली. यानंतर सुखाचा संसार सुरू होण्याऐवजी छळाचे सत्र सुरू झाले.माहेरून पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन ये," अशी मागणी करत पती फैजानसह सासरे जावेद, सासू शमशाद, दीर फुरखान, जाऊ उमेरा आणि नणंद आसिफा, तेहसीन व मौना यांनी नर्गिसचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
सरच्या जाचाला कंटाळून नर्गिसने सोलापूर शहर पोलीस कार्यालयातील महिला समस्या निवारण केंद्रात धाव घेतली होती. पोलिसांनी फैजानला बोलावून समज दिली, तेव्हा त्याने नर्गिसला नांदवायला नेतो असे सांगितले. मात्र, बाहेर पडताच "तुला सोडणार नाही, तुझा जीव घेईन," अशी धमकी त्याने दिली. इतकेच नाही तर त्याने कौटुंबिक न्यायालयात विभक्त होण्यासाठी दावाही दाखल केला होता.१५ एप्रिलच्या रात्री फैजानने नर्गिसला फोन करून घराबाहेर येण्याचे आणि जीवे मारण्याचे आव्हान दिले होते. नर्गिस आपल्या आईच्या घरी (लोकमान्य नगर) आई सायराबानू आणि बहिणींसोबत बसली असताना रात्री १० वाजता फैजान तिथे पोहोचला.मला नर्गिससोबत एकांतात बोलायचे आहे, तुम्ही बाहेर जा," असे सांगून त्याने आई आणि बहिणीला घराबाहेर काढले.
त्यांनी बाहेर पाऊल ठेवताच फैजानने घराची कडी आतून लावून घेतली. स्वतःच्या कपड्यांमध्ये लपवून आणलेली पेट्रोलची बाटली त्याने काढली आणि काही कळण्याच्या आत नर्गिसच्या अंगावर ओतून लायटरने तिला पेटवून दिले.र्गिस आगीच्या ज्वाळांनी वेढलेली असताना आणि मदतीसाठी ओरडत असताना, फैजानने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि दरवाजा उघडून तिथून पळ काढला. नर्गिसच्या ओरडण्याने परिसरात एकच गर्दी झाली. तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पीडित नर्गिस शेख हिने दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात पती फैजान, सासरे जावेद, सासू शमशाद आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

0 Comments