Ticker

6/recent/ticker-posts

पोहण्याचा मोह बेतला जीवावर, १७ वर्षीय तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू





बार्शी - बार्शी तालुक्यातील खामगाव परिसरात शुक्रवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा खाणीतील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सिद्धार्थ बालाजी सुरवसे (वय १७, रा. खामगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सिद्धार्थ आपल्या मित्रांसोबत खामगाव-बार्शी रोडवरील येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या एका खाणीत पोहण्यासाठी गेला होता. सिद्धार्थला पोहता येत नव्हते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला.


सिद्धार्थ पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. आवाजाच्या दिशेने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांच्या मदतीने सिद्धार्थला तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आले, परंतु दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता.या घटनेची खबर अभिजित योगीराज सुरवसे (वय २७, रा. खामगाव) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पांगरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments