पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार गायकवाड हा गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहर आणि परिसरात सक्रिय होता. त्याच्यावर २०२२, २०२३, २०२४ आणि २०२६ या कालावधीत दागिने आणि मोबाईल चोरी करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे या १० गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याला यापूर्वीच दोषी ठरवून शिक्षादेखील सुनावली आहे. मात्र, तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याचे समोर आले होते.यकवाड याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाची गंभीर दखल घेत, पोलीस उपायुक्तांनी ओंकार गायकवाड याला पुढील दोन वर्षे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

0 Comments