Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू



​सोलापूर: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील रुद्देवाडी बसस्थानकाजवळ आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि मुरुमाने भरलेल्या डंपरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण धडकेनंतर डंपरने पेट घेतल्याने आणि बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेने जाणारी एसटी बस रुद्देवाडी बसस्थानकाजवळ आली असता, समोरून येणाऱ्या मुरुमाने भरलेल्या भरधाव डंपरने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. धडक दिल्यानंतर काही अंतरावर जाऊन डंपर उलटला आणि त्याने तात्काळ पेट घेतला.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.अनेक प्रवासी जखमी असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments